मुंबई : यापूर्वी सोशल मीडियामध्ये फारसा रस न दाखवणारी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने अखेर आपल्या वाढदिवशी फेसबूकवर खातं उघडलं आहे. आपले विचार आणि मतं मांडण्यासाठी फेसबुक हे एक प्रभावी माध्यम असल्याची जाणीव झाल्यानेच तिने हा निर्णय घेतला.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसेंदिवस फेसबुकचे वाढत जाणारे महत्त्व पाहून कतरिनाही प्रभावित झाली आहे. बार बार देखो या सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या तिच्या फिल्मचं प्रमोशन तिने फेसबुकवरून केलं आहे. इतकंच नाही तर कतरिनाने चाहत्यांशी संवाद साधणारा एक खास व्हिडिओही शेअर केला आहे.