मुंबई : सुशांत सिंग राजपूतला नवी फॅन मिळाली आहे आणि ही कोणी साधी फॅन नाही तर बॉलिवूडची बार्बी डॉल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंग राजपूतचा 'एमएस धोनी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणारा बायोपिक सिनेमा ठरलाय... आणि त्यानंतर इतरांसोबतच बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ सुशांतसिंग राजपूतची डाय हार्ड फॅन झालीय.


'एम एस धोनी - अनटोल्ड स्टोरी'मधील सुशांत सिंग राजपूतची भूमिका अनेकांना आवडलीय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 116 कोटींची घसघशीत कमाई केलीय. याबरोबर या सिनेमाने फरहान अख्तरच्या 'भाग मिल्खा भाग' या सिनेमाला मागे टाकत सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या बायोपिकचा मुकूट पटकाविलाय.


नीरज पांडे दिग्दर्शित या सिनेमासाठी सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती. हा सिनेमा बघून सुशांतची एक्स-गर्लफ्रेण्ड अंकितानंही सुशांतला अभिनंदनाचा मेसेज पाठविला होता.


सुशांतसिंग राजपूत आता दिनेश विजनच्या 'राब्ता' या सिनेमात दिसणार आहे. हा एक रोमॅण्टिक सिनेमा असून सिनेमात सुशांतसोतब क्रिती सॅनन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्याबरोबर क्रिती आणि सुशांतच्या अफेअर्सची चर्चा होत होती. मात्र, दोघांपैकी कोणीही त्यांच्या प्रेमाची कबुली अद्याप दिलेली नाहीय.


असो... सुशांतच्या पर्सनल लाईफमध्ये जरी अप्स अॅण्ड डाऊन सुरु असलं तरी प्रोफेशनली सुशांतचा करिअर ग्राफ वाढत चाललाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.