नवी दिल्ली: रणबीर आणि कतरिनाचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. या दोघांमधला दुरावा वाढल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर आणि कतरिना दिल्लीतल्या ऑटो एक्स्पो शो ला उपस्थित होते. पण हे दोघंही एकमेकांना भेटले नाहीत.


हिरो मोटोकॉर्प च्या बाईकचं अनावरण करण्यासाठी रणबीर सकाळी 11 वाजता ऑटो एक्स्पो मध्ये पोहोचला, पण एका तासाच्या आत रणबीर तिथून निघाला. रणबीर तिथून निघून गेल्यावर कतरिना ऑटो एक्स्पोमध्ये पोहोचली आणि तिनं जॅग्वार एक्सई ही गाडी लॉन्च केली. 


आता या दोघांनी मुद्दामहून एकमेकांना भेटणं टाळलं, का ऑटो एक्स्पो च्या व्यवस्थापकांनी हे दोघं एकाच वेळी एकत्र येणार नाहीत याची काळजी घेतली. हे मात्र समजू शकलं नाही.