बॉलिवूडच्या अभिनेत्यांचा पाहा पहिला पगार किती होता
नोकरी कशी आहे काय आहे हे बघण्याआधी पहिले आपण विचार करतो तो म्हणजे माझी सॅलरी किती असेल? कोणताही अनुभव नसताना... काहीही संघर्षदेखील केला नसताना काही जण थेट ४० - ५० हजारांच्या नोकरीची स्वप्नं बघायला लागतात.
मुंबई : नोकरी कशी आहे काय आहे हे बघण्याआधी पहिले आपण विचार करतो तो म्हणजे माझी सॅलरी किती असेल? कोणताही अनुभव नसताना... काहीही संघर्षदेखील केला नसताना काही जण थेट ४० - ५० हजारांच्या नोकरीची स्वप्नं बघायला लागतात.
मात्र, तुमच्या या फेव्हरेट हिरो-हिरोईन्सचा पहिला हातात मिळालेला पगार किती होता, हे माहितेय तुम्हाला का? नसेल तर हे पाहाच...
करिना कपूर :
केवळ ११,०००... हो तुम्हालाही बसला ना आश्चर्याचा धक्का. संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम'साठी करिनाला मिळालेले फक्त ११,०००... मात्र ऐश्वर्याला घेतल्यानंतरही करिनाने हे पैसे भन्साळींना परत केले नव्हते.
आयुष्यमान खुराना :
फक्त १,०००... एका टीव्ही शोसाठी आयुष्यमानला मिळालेले केवळ १,००० रूपयांचे मानधन
जॉन अब्राहम :
एका अॅड एजन्सीमध्ये जॉन काम करत होता, तेव्हा त्याचा पहिला पगार होता ६,५०० रुपये फक्त
प्रत्येकाला आपलं स्वत:च घर असावं, असं देखील वाटतं... पण तुमच्या या बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी घर कशी घेतलीत माहितेय तुम्हाला...
- जॉनने त्याच पहिलं वांद्रे येथील घर घेतलेलं कर्जाच्या हफ्त्यांवर...
- तर करिना कपूर म्हणतेय की मी कधी घर घेतलंच नाही. मी कायम माझ्या कुटुंबासोबत राहिलेय.
- आयुष्यमानचे पहिले घर हा काही बंगला किंवा कोणता डुप्लेक्स नव्हता तर होते तुमच्या आमच्या-सारखेच एक छोटे २ बीएचकेचं घर...