मुंबई : विकेन्डला बोनी कपूर यांचा लक्षमण उतेकर दिग्दर्शित लागबागची राणी हा सिनेमा झळकलाय.  लालबागची राणी हा सिनेमा कसा आहे, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी यासाठी सिनेमावर एक नजर टाकूया.


कहाणी लालबागच्या राणीची


लालबागची राणी ही कहाणी आहे लालबागमध्ये राहणा-या संध्या या व्यक्तिरेखेची. ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री वीणा जामकरनं. संध्या एक स्पेशल चाईल्ड आहे. आपल्या छोट्याशा जगात ती आनंदानं राहते. संध्या एका मानसिक आजारानं जरी त्रस्त असली तरी जगाकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन खूपच सकारात्मक आहे. ती कायम आनंदी असते, तिला कुणाची भीतीही नाही. संध्याच्या २४व्या वाढदिवशी तिचे आई बाबा तिच्या छान वाढदिवस साजरा करतात, आणि तिला बाहेर फिरायला घेउन जातात. 


चित्रपटातील टर्निंग पॉईंट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या त्या गर्दीच संध्या हरवते.. मग काय घडतं? यावरच संपूर्ण सिनेमा आहे. संध्या एक स्पेशल चाईल्ड असल्यामुळे तिचे आई बाबा अधिक चिंतेत असतात, तिथे संध्या आपली वाट शोधत अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटते. या सगळ्यांना संध्या आपल्या सकारात्मक आणि निरागस स्वाभावातून काही न काही देउन जातेय.. अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा लालबागची राणी हा सिनेमा आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शन


दिगेदर्शक लक्षमण उतेकरचा हा दुसरा सिनेमा. या आधी त्यानं टपाल हा सिनेमा केला होता. टपाल आणि या सिनेमात तसा भरपूर फरक आहे. लालबागची राणी या सिनमेाची कथा अप्रतिम आहे. दिग्दर्शकांनं त्याची मांडणीही छान केलीये. मात्र सिनेमाचा स्क्रिनप्ले जरा फसलाय. 


कथा चांगली मात्र...


लालबागची राणी या सिनेमातली प्रमुख व्यक्तिरेखा संध्या तिच्या त्या प्रवासात अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटते पण ती प्रत्येक भेट हवी तितकी मनाला भिडत नाही. या सगळ्यांमध्ये केवळ तिची आणि पार्थ भालेराव अर्थातच या सिनेमातल्या गोविंदासोबतची भेट कमाल झालीये. प्रेक्षकांमध्ये इमोशन्स क्रिएट करणं हे सोपं नाही, तरी दिग्दर्शक लक्षमण उतेकर यांनी लालबागची राणी या सिनेमाच्या निमीत्तानं एक चांगला प्रयत्न केलाय. सिनेमाचे संवाद बरे आहेत, त्यावर जर आणखी काम करता आलं असतं तर कदाचित सिनेमा आणखी रंजकदार झाला असता.


वीणा जामकरच्या अभिनयाचा कस


अभिनेत्री विणा जामकरनं या सिनेमात एका स्पेशसल चाईल्डची भूमिका पार पाडली आहे.. विणासाठी ही व्यक्तिरेखा साकारणं नक्कीच अव्हानात्मक असेल, पण तिनं ती भूमिका छान पार पाडलीये. अभिनेता अशोक हांडे, पार्थ भालेराव, प्रथमेश परब, नेहा जोशी, नंदिता धूरी यांनीही आपआपल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडल्या आहेत. 


किती स्टार्स 


सिनेमातील सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला मिळतायत २.५ स्टार्स.