या व्हिडिओमुळे झाली कंदील बलोचची हत्या?
पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोच हीची तिच्या भावानंच हत्या केली आहे.
मुंबई : पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोच हीची तिच्या भावानंच हत्या केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांनी कंदीलचा भाऊ वसीमला अटक केली आहे. कंदीलच्या फेसबूक पोस्ट आणि वादग्रस्त व्हिडिओमुळे कुटुंबाला त्रास होत होता, त्यामुळे कंदीलला औषध देऊन बेशुद्ध केलं आणि तिची गळा दाबून हत्या केली, अशी कबुली तिच्या भावानं दिली आहे.
हा होता कंदीलचा शेवटचा व्हिडिओ
कंदीलनं नुकतंच बॅन नावाचा एक व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमुळे कंदीलच्या भावाचा राग आणखी वाढला आणि त्यानं कंदीलचा खून केल्याचं बोललं जात आहे.