लता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी `आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी` फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या फंडसाठी स्वत: लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 'आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी' फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या फंडसाठी स्वत: लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या तमाम चाहत्यांनाही आर्मी वेल्फेअर फंडसाठी मदत करण्याचं आवाहन केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक दशके आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर पुन्हा एकदा सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्यात.
सोशल मीडियाच्या मदतीने त्यांनी हे आवाहन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून लता मंगेशकर यांनी सैनिकांना मदत करण्यासाठीचे आवाहन केले. ‘देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या वीर जवानांसाठी त्यांनी हे ट्विट केले आहे. जे वीर जवान आपल्या प्राणांची फिकीर न करता देशवासियांच्या संरक्षणासाठी तत्पर असतात. मग अशा जवानांसाठी आपण देशवासियांनीही आपल्या परिने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. मी एक आद्य कर्तव्य समजत माझ्या वतीने जवानांसाठी काही रक्कम देत आहे.
तसेच २८ सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे त्या दिवशी मला भेटवस्तू, पुष्पगुच्छ, केक देण्यापेक्षा मला या वर्षी एका वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा द्या, असे विनम्र आवाहन लतादीदींनी केले आहे.