`दे धक्का` आता हिंदीत, संजय दत्त करणार प्रमुख भूमिका
मराठीमध्ये गाजलेला दे धक्का चित्रपट आता हिंदीमध्ये येणार आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहे.
मुंबई : मराठीमध्ये गाजलेला दे धक्का चित्रपट आता हिंदीमध्ये येणार आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही घोषणा केली आहे. शनिवारी संजय दत्तचा 57 वा वाढदिवस झाला. यावेळी ही घोषणा करण्यात आली.
या चित्रपटात संजय दत्त 43-44 वर्षांच्या वडिलांच्या भूमिकेत असेल. पंजाबी माणसाची ही भूमिका असली तरी संजय दत्त सरदार नसेल असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.
याआधी संजय दत्त आणि महेश मांजरेकर यांनी वास्तव, कुरुक्षेत्र आणि रक्त या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध अजून सुरु आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होईल. जुलै किंवा ऑगस्ट 2017मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.