चेन्नई : दक्षिण भारतातील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका थलायवा रजनीकांत आणि त्याचे चाहत्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे. चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी रजनीकांतच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक केला. यासाठी त्याने लाखो लिटर दूध वाया घालवले, म्हणून त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. आय एम एस मनिवन्ना यांनी हा खटला दाखल केला आहे. रजनीकांत यांनी स्वतःहून पुढे येऊन अन्नाचा हा अपव्यय थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


या तक्रारदार व्यक्तीने रजनीकांत आणि त्यांच्या चाहत्यांना न्यायालानेच निर्देश द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. दरम्यान न्यायालाने याप्रकरणी रजनीकांत यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यावर उत्तर देण्यास सांगितले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ११ एप्रिलला होणार आहे.