नवी दिल्ली : अभिनेत्री लीजा हेडन आई बनलीय. १७ मे रोजी तिनं एका मुलाला जन्म दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक महिन्यांपासून ३० वर्षीय अभिनेत्री लीजा हेडन आपल्या फोटोंमुळे चर्चेत होती. लीजानं नुकताच एक फोटो सोशल वेबसाईटवर शेअर केलाय. यामध्ये तिच्या हातात तिचं छोटं बाळ आहे... आणि सोबत तिचा पती डिनो ललवानी दिसतोय. 



या फोटोला कॅप्शन देत 'जॅक ललवानीचा जन्म १७ मे २०१७ रोजी झाला' असं म्हटलंय. लीजानं सात महिन्यांपूर्वी म्हणजेच २९ ऑक्टोबर २०१६ रोजी तिचा अनेक दिवसांपासूनचा बॉयफ्रेंड डिनो ललवानी याच्याशी विवाह केला होता.