मुंबई : मोठ्या पडद्यावर दीर्घ काळानंतर परतणाऱ्या अभिनेत्री रवीना टंडन हिच्या 'मातृ' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आईचा दु:खद प्रवास या चित्रपटात चित्रित करण्यात आलाय. आपल्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर न्याय मिळवण्यासाठी ती लढाई करताना या चित्रपटात दिसतेय. 


या लढाईत तिला आपल्या नात्यांनाही गमवावं लागलंय. कायद्यावरचा विश्वास उडाल्यानंतर ती आपल्या पद्धतीनं गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी ही आई सज्ज झालीय.