पाच वर्षाच्या प्रचितीने जिंकली सगळ्यांची मने...
महाराष्ट्रात कलेची आणि गुणी कलाकारांची कमी नाही. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या डांस शो मध्येदेखील महाराष्ट्रातील असेच कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठी घेऊन येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कलेची आणि गुणी कलाकारांची कमी नाही. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या डांस शो मध्येदेखील महाराष्ट्रातील असेच कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठी घेऊन येणार आहे.
ज्यांच्या डांसमध्ये MADness असेल त्यांना या कार्यक्रमामध्ये येण्याची संधी मिळणार आहे. 2 MAD - महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाच्या ऑडीशन्सच्या वेळेस अनेक अफलातून डांसर आले ज्यांनी त्यांच्यातील कला गुण, वेगवेगळ्या नृत्यशैली परीक्षकांना दाखवल्या आणि परीक्षकांची मने जिंकली.
या ऑडीशनमध्ये अनेक लहान मुल देखील आली पण वयोमर्यादेमुळे त्यांना या कार्यक्रमाचा भाग होता आल नाही पण त्यांनी परीक्षकांकडून दाद मिळवली. अशीच एक चिमुकली या मंचावर आली आणि जिने सगळ्यांना आपलस केले.
प्रचिती जी अवघ्या ५ वर्षांची आहे तिने तिन्ही परीक्षकांना वेड लावल. तिच्या डांस मूव्हज, चेहऱ्यावरील हावभाव, स्टेप्स आणि तीच बोलण हे सगळच परीक्षकांना भावल. तिने डांस सुरु करताच परीक्षक थक्क झाले,
आपण आजकल अनेक डांस शोजमधून महराष्ट्रात तर काय संपूर्ण भारतामधील कलाकारांकमध्ये असलेले अद्वितीय असे talent बघतो. आणि तसच काहीस 2 MAD च्या मंचावर देखील झालं. ऑडीशन सुरु असताना अवघ्या ५ वर्षाची चिमुकली मंचावर आली आणि तिने तिन्ही परीक्षकांना उभ राहून टाळ्या वाजविण्यास आणि मंचावर येऊन तिच्याबरोबर स्टेप्स करण्यास भाग पडले.
या चिमुकलीच्या एनर्जी, अदाकारीचे आणि निरागसतेचे परीक्षक FAN तर झालेच पण ती परीक्षकांची फेवरेट सुध्दा झाली. संजय जाधव तर तिला घरी घेऊन जायला तयार होते इतकी ती त्यांना आवडली. तर हि चिमुकली 2 MAD च्या अंतिम सोहळ्यात एका नृत्याचे सादरीकरण करणार असे देखील संजय जाधव म्हणाले.
उमेश जाधव यांनी प्रचीती म्हणजे 2 MAD ला मिळालेले अनमोल रत्न आहे असे म्हणाले आणि तिच्याबरोबर सेल्फीदेखील काढला. इतक्या लहान वयामध्ये नृत्याबद्दलची जाण हे खरच उल्लेखनीय आहे ह्यात वाद नाही. अमृता खानविलकरने या चिमुकली बरोबर दोन स्टेप्सदेखील केल्या.