मुंबई : माधुरी दीक्षित-नेनेला एक भीती सतत वाटत आहे. ती सध्या चिंतेत आहे. कारण संजय दत्त याच्या बायोपिकमधून पूर्वायुष्याबद्दल दोघांचे रहस्य उलघडण्याची शक्यता असल्याने ती टेन्शनमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमार हिरानी संजय दत्तच्या जीवनावर सिनेमा काढत आहे. मात्र, आधीच्या स्क्रिप्टमधील संजय आणि माधुरी यांच्या रिलेशनशिप संबंधाबाबत जी काही वाक्य होती ती काढली आहेत. परंतु ही वाक्य खरच काढली आहेत का, हा प्रश्न माधुरीला सतावत आहे. तिने यासाठी संजय दत्तची मदत घेतली. त्यासाठी तिने संजयला कॉल केला, असे वृत्त मिड-डे आणि बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने दिलेय.


असे सांगितले जात आहे की, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित रिलेशनशिपमध्ये होते. सूत्रांनी सांगितले की, माधुरी आणि संजय दत्तचे ब्रेकअप होऊन खूप वर्ष झालीत. दोघेही आपल्या कुटुंबीयांत खूश आहेत. यामुळे दोघांना आधीचा काळ आठवण नको आहे. त्यामुळे माधुरीने यांची खातरजमा करण्यासाठी आपल्या रिलेशनशिपबाबत सिनेमात काहीही नाही ना. यावेळी माधुरीला संजयने शब्द दिलाय, काहीही असणार नाही. मात्र, त्याआधीच मेकर्सने रिलेशनशिपबद्दलचे प्रसंग आधीच काढून टाकण्यात आलेत.


माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांनी 'खलनायक', 'साजन', ' साहिबा' आदी हिट सिनेमे दिलेत. संजय दत्तला १९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोटात आरोपी म्हणून जेल झाली. तेव्हापासून माधुरीने त्याच्यासोबतची रिलेशनशिप तोडली. तोपर्यंत तिचे संबंध होते. 


राजकुमारच्या संजय दत्तवरील सिनेमात रणबीर कपूरला साईन करण्यात आलंय. तर दोन अभिनेत्रींनाही साईन करण्यात आलेय. संजयची पहिली पत्नी रिचा शर्मा हिची भूमिका एक करेल आणि दुसरी सध्याची पत्नी मान्यताची भूमिका करणार आहे.