मुंबई : संजय दत्तच्या बायोपिकची शूटिंग सध्या सुरु आहे. आता चर्चा अशी आहे की,  या सिनेमात केवळ संजय दत्तच्या प्रोफेशनल लाईफ आणि न्यायालयीन जीवनाबद्दलच नाही तर त्याच्या वैयक्तीक लाईफ बद्दलही दाखवलं जाणार आहे. अशातच माधुरी दिक्षीतने सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची भेट घेतली आणि तिच्या सारख्या भूमिकेला हटवण्यासाठी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्त जेलमध्ये जाण्यापूर्वी संजय दत्त आणि माधुरी यांच्यात अफेयर असल्याच्या चर्चा होत्या. सिनेमामध्ये करिश्मा तन्ना एक डांसिंग डिवा क्वीनच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. तिचा रोल माधुरी दिक्षीतशी जुळतो. अभिनेत्री सोनम कपूर आणि दिया मिर्जा यांची देखील यांच्याशी संबंधिच भूमिका देखील या सिनेमामध्ये दाखवण्यात आल्या आहेत. राजकुमार हिरानी यांनी माधुरी दिक्षीत यांची मागणी मान्य केली असल्याची देखील चर्चा आहे. पण या गोष्टीमुळे तिला काहीही फरक पडत नसल्याचं तिने म्हटलं आहे.


एका हिंदी वेबसाईट्च्या रिपोर्टनुसार, 'धक-धक' गर्ल माधुरीने या मुद्दायावर तिचं मत जाहीर करण्यासाठी राजकुमार हिरानी यांची भेट घेतली होती. रणवीर कपूर या सिनेमामध्ये संजय दत्तची भूमिका साकारणार आहे.