नवी दिल्ली : मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री भावनाचे अपहरण करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. शुक्रवारी रात्री ही घटना घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक कऱण्यात आलीये. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शूटिंगवरुन परतत असताना तीन व्यक्तींनी जबरदस्ती त्यांचे फोटो काढणं सुरु केलं. 


त्यानंतर या व्यक्तींनी भावनाचं गाडीसह अपहरण केलं. बराच वेळ ते गाडी फिरवत राहिले. अखेर रात्री साडेदहाच्या सुमारास अभिनेत्रीला घराच्या जवळ तिला सोडण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी अभिनेत्रींच्या ड्रायव्हरला अटक केली.