मुंबई : अनुराग कश्यपचा उडता पंजाब चित्रपट लीक करणाऱ्याची ओळख पटली आहे, या व्यक्तीला लवकरच अटक होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. हा चित्रपट लीक झाल्यानंतर निर्माते अनुराग कश्यप आणि एकता कपूर यांनी सायबर क्राईमकडे तक्रार केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सॉर बोर्डाकडूनच हा चित्रपट लीक झाल्याच्या चर्चाही सुरु आहेत. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. बोर्डाकडे सर्टिफिकेशनसाठी आलेली कॉपी लीक झालेली नाही, असं निहलानी म्हणाले आहेत. सेन्सॉर बोर्डाकडूनच उडता पंजाब लीक झाला असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता आमिर खाननं दिली आहे. 


याआधी सेन्सॉर बोर्डानं उडता पंजाब चित्रपटावर आक्षेप घेतले होते. या चित्रपटातले ८९ सीन आणि चित्रपटाच्या नावातलं पंजाब काढून टाकायला सेन्सॉर बोर्डानं सांगितलं होतं. यानंतर हा वाद कोर्टात गेला अखेर फक्त दोन सीन कट करून चित्रपट रिलीज करायला कोर्टानं परवानगी दिली.