मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉसमधून चर्चेत आलेली अभिनेत्री मंदना करिमीने साखरपुडा केलाय. याच वर्षी ती दिल्लीचा बिझनेसमन गौरव गुप्ताशी विवाहबंधनात अडकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदनाने सोशल मीडियावरुन ही बातमी तिच्या चाहत्यांना दिलीये. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंदनाचे लग्न झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. तसेच तिचे फोटोही समोर आले होते. 


मंदनाने ट्विटरवर फोटो शेअर करताना आपल्या साखरपुड्याची बातमी दिलीये. मंदनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी दिसत आहे. 


मंदना रिअॅलिटी शो बिग बॉस९मध्ये होती. त्यानंतर तिने अॅडल्ट कॉमेडी फिल्म क्या कूल है हममध्येही काम केले होते.