मुंबई : बिग बॉस प्रत्येक सीजनमध्ये कोणत्या तरी कारणांमुळे चर्चेत येतोच. बिग बॉसची यंदाही खूप चर्चा आहे. सोमवारच्या भागात असं काही घडलं की चर्चा रंगू लागल्या. मनू पंजाबी यांनी मोनालिसासाठी ओम स्वामीवर हात उचलला. घरातील इतर लोकांनी त्यांना रोखलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवाराच्या एपिसोडमध्ये होस्ट सलमान खानने घरातील व्यक्तींना स्वामीचा तो व्हिडिओ दाखवला जेव्हा ते सीक्रेट रुममध्ये होते. त्यानंतर घरातील अधिक लोकं स्वामींच्या विरोधात झाले. व्हिडिओमध्ये ओमजी स्वामी हे मोनालिसाबाबत अपशब्द वापरत असतांना दिसले. जेव्हा ते सिक्रेट रुममध्ये होते तेव्हा त्यांनी कॅमेऱ्याच्या मदतीने पाहिलं की मोनालिसा बिग बॉसच्या घरात डान्स करत होती तेव्हा त्यांनी मोनालिसाला म्हातारी असं म्हटलं. सोमवारी ओमजी स्वामींनी मोनालिसाला मनची गर्लफ्रेंड असल्याचं सांगत, मनुने त्याच्या प्रेमिकेला वाचवण्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारला त्यामुळे मनू संतापला.


मोनालिसा काल 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी' या गाण्यावर डान्स करत होती. तेव्हा ओम स्वामी तिला पाहत होते. ओम स्वामींनी तिच्याकडे पाहत म्हटले, म्हातारपणात ही जवानी कुठून आली...आणि तोंडावर मेकअप थापल्याने काही माणूस तरुण होत नाही. ओम स्वामी अशाप्रकारचे विधान करतील याची कोणाला अपेक्षाच नव्हती. तसंच नॉमिनेशनपासून बचाव करण्यासाठी युथला अशाप्रकारे आकर्षित करत आहे. किती घाणेरडी लोक आहेत, असेही ते पुढे म्हणाले.