मुंबई : मरिन लाईन्स येथील लिबर्टी सिनेमा मध्ये होण्याऱ्या कशिश फिल्म फेस्टिवलमध्ये निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित 'दारवठा'चे २९ मे रोजी स्क्रिनिंग होणार आहे. दारवठा ही एक मराठी शॉर्ट फिल्म आहे. ३० मिनिटांची ही शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर आधारित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काय आहे ही शॉर्ट फिल्म?


ही गोष्ट आहे एका किशोरवयीन मुलाची. जो इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याला सुपरमॅन, स्पायडरमॅन यांच्यात रस नसून आईचे दागिने, मुलींची खेळणी, मेकअप ह्याची जास्त आवड आहे. ही सर्वसामान्य मुलांची कथा नसून समाजातील एका नाजूक पण तेवढ्याच गंभीर विषयावर आधारित कथा आहे.

यात मुलाची भूमिका निशांत भावसरने केली असून नंदिता धुरी, अनुराग वरळीकर, संजय पूरकर, रुची शर्मा आदी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या शॉर्ट फिल्मच्या दिग्दर्शनाकरिता निशांत रॉय बोम्बार्डे यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. 'दारवठा'चे या आधी इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एंजेलिसमध्ये स्क्रिनिंग झाले होते.