टीआरपीमध्ये `माझ्या नवऱ्याची बायको` मालिका अव्वल
झी मराठी वाहिनीवरील `माझ्या नवऱ्याची बायको` या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. गुरुनाथ सुभेदार आणि शनाया यांना दूर करण्यासाठी राधिका सुभेदार लढवत असलेल्या विविध शक्कल यांमुळे या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे.
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. गुरुनाथ सुभेदार आणि शनाया यांना दूर करण्यासाठी राधिका सुभेदार लढवत असलेल्या विविध शक्कल यांमुळे या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे.
झी मराठीच्या टॉप 5 मालिकेत या मालिकेने अव्वल स्थान मिळवलेय. तर दुसऱ्या स्थानावर आहे गौरी-शिवची प्रेमकहाणी असलेली 'काहे दिया परदेस'. काही दिवसांपूर्वीच नव्याने दाखल झालेली राणा आणि अंजलीची गोष्ट असलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतेय.
ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे तर 'चला हवा येऊ द्या - महाराष्ट्र दौरा' आणि 'खुलता कळी खुलेना' ही मालिका अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहे.