मुंबई : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल होताना दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री प्रियांका चोप्रा न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गाला २०१७ च्या रेड कार्पेटवर थिरकताना दिसली. यावेळी, प्रियांकानं ट्रेन्च कोट फॅशन कॅरी करत बॉलगाऊन परिधान केला होता. या ड्रेसचा मागचा भाग बराच मोठा होता. 


प्रियांका सध्या आपल्या अमेरिकन टीव्ही सीरीजमध्ये सीआयए एजंटच्या भूमिकेत दिसतेय. मेट गाला रेड कार्पेटवर तिचा दिसलेला लूकवर याच भूमिकेचा प्रभाव होता. प्रियांकानं या ड्रेससोबत बूट घातले होते. प्रियांकाचा हा गाऊन इतका मोठा होता की तिच्यासोबत एक व्यक्ती तिचा हा गाऊन सांभाळताना दिसत होता. 


प्रियांकाचा हा ड्रेस वर्ल्ड रेकॉर्ड बनवू शकतो, असंही म्हटलं जातं. या ड्रेसचा मागचा भाग आत्तापर्यंतचा सर्वात लांब ड्रेस असल्याचं म्हटलं जातंय. हा जगातला सर्वात लांब ट्रेन्च कोट आहे. अर्थातच असा ड्रेस परिधान करणं म्हणजे 'फॅशन रिस्क' ठरू शकतं. परंतु, प्रियांकानं आपल्या आत्मविश्वासासहीत या ड्रेसला आपलं स्टाईल स्टेटमेंट ठरवलं. 


परंतु, सोशल मीडियावर याची चर्चा न होईल तरच नवल... त्यातही याची टर उडवणाऱ्यांची कमतरता नव्हती...