फेसबूकवर नको ते उद्योग, आर्ची म्हणून उद्योगमंत्र्यांना फोन
आपल्या अप्रतिम अभिनयाने सैराट या पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरूमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंतर रिंकू राजगुरूला अभिनंदनाचे फोन सुरू आहे. पण ते फोन रिंकूकडे न जाता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जात आहे.
मुंबई : आपल्या अप्रतिम अभिनयाने सैराट या पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरूमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंतर रिंकू राजगुरूला अभिनंदनाचे फोन सुरू आहे. पण ते फोन रिंकूकडे न जाता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जात आहे.
कोणी केला खोडसाळपणा
सध्या फेसबूकवर रिंकू राजगुरू हिच्या 'फेक'बुक पेज पेव फुटलं आहे. तिचे कोणतेही पेज ऑफिशियल नाही. तिच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली तर काही जणांनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा मिळविण्यासाठी हे फेसबूक पेज तयार केले आहेत.
कोणी केला हा उद्योग
रिंकू राजगुरूच्या नावाने फेसबूक पेजवर सुभाष देसाई यांचा मोबाईल नंबर रिंकूचा नंबर म्हणून टाकला आहे. हे कोणते फेसबूक पेज आहे याचा अजून शोध लागला नाही.
कोणाच्या 'उद्योगा'मुळे सुभाष देसाईंना अभिनंदनाचे हजारो फोन येऊ लागले. बरं हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं असतं तर ठीक, पण ‘सॉरी राँग नंबर आहे’ असं सांगूनदेखील देसाईंची खरी पंचाईत तेव्हा होते, जेव्हा समोरचा कॉलर त्यांना विचारतो की ‘मग तुम्ही कोण बोलताय?’
चार-चौघात किंवा कुठल्या कार्यक्रमात सारखं ‘मी उद्योग मंत्री बोलतोय’ हे सांगणं सुद्धा त्यांना कठीण होऊन बसलं.
थेट मंत्री महोदयांचा नंबर एखाद्या लोकप्रिय नायिकेच्या संकेतस्थळावर येणं, हा नक्कीच योगायोग नसावा. हा प्रकार नजरचुकीने झाला की कोणाचा खोडसाळपणा याचा थांगपत्ता अजून लागलेला नसला, तरी योग्य ठिकाणी तक्रार करून या कॉल्सचा मी बंदोबस्त केल्याचं स्पष्टीकरण सुभाष देसाईं यांनी दिलं आहे.
'फेक'बूकवर कारवाई होणार का?
उद्योगमंत्री असा खोडसाळपणा करणाऱ्या फेसबूक पेजवर कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.