मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रेग्नंट मीरा राजपूतची तब्येत नाजूक असल्याने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीराची तब्येत सतत नाजूक असल्यामुळे तिला मागील महिन्यातही रूग्णालयात दाखल करावे लागले होते. तिला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेय. यावेळी रुग्णालयात मीराचे कुटुंबियही उपस्थित आहेत.


उडता पंजाबवरुन सुरु असलेले वाद त्यातच लीक प्रकरणामुळे शाहिद थोडा व्यस्त असला तरी मीराकडे मात्र त्याचे पूर्ण लक्ष आहे.