नवी दिल्ली : ६३ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपल्यानंतर बाहेर पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती कल्की कोचलीन या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मार्गरीटा विथ अ स्ट्रॉ' या सिनेमासाठी कल्कीला स्पेशल ज्युरी अॅवार्ड देण्यात आला होता. तिच्यासाठी ही खूपच मोठी गोष्ट होती. पण अशा आनंदाच्या क्षणी असं वर्तन होण्याची घटना दुर्दैवी आहे. 


सोहळ्या संपल्यानंतर कल्की तिच्या कारच्या दिशेने निघाली आणि तिच्यासोबत असणारा सुरक्षारक्षक ही अमिताभ यांच्याकडे निघून गेला. त्यानंतर अनेक लोकं तिच्याजवळ पोहोचले. कल्कीचं असं म्हणणं आहे की काही लोकांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं. या घटनेची कल्कीने आयोजकांकडे तक्रार ही केली असल्याचं एका वेबसाईटने सांगितलं आहे.