नवी दिल्ली : 'मिस युनिव्हर्स किताबाची यंदाची मानकरी ठरली आहे फ्रेंचची ईरिस मित्तेनेर. 24 वर्षीय फ्रेंच मॉडेल ईरिस हिने इतर 85 स्पर्धक युवतींवर मात करत 'मिस फ्रान्स' हा किताब मिळवला होता. 25 वर्षीय मिस हैती रॅक्वेल पेलिसिअर उपविजेती ठरली. तर 23 वर्षीय मिस कोलंबिया आंद्रिया तोवर ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली. 


तब्बल 44 वर्षांनी फ्रान्सला हा मान मिळाला. मागील वर्षी पिया वुर्त्सबाख हिच्या रुपाने फिलिपिन्सला 40 वर्षांनी 'मिस युनिव्हर्स'चा मान मिळाला होता. मिस युनिव्हर्स हा किताब 1952 मध्ये सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1953 मध्ये फ्रेंच सुंदरी ख्रिस्तियान मार्टेल हिने हा किताब पटकावला होता. मात्र, त्यानंतर फ्रेंच चाहत्यांना 44 वर्षे वाट पाहावी लागली.