लॉस अँजेलिस : ८९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झालीय. मूनलाइट हा सर्वोत्कृष्ठ सिनेमा ठरला आहे. पण सर्वोत्कृष्ठ सिनेमाची घोषणा करतांना एक घोळ झाला. ऑस्कर सोहळ्यात असं पहिल्यांदाच घडलं. 


प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सुरुवातीला ला ला लॅन्डची घोषणा करण्यात आली. मात्र त्यानंतर हा पुरस्कार मूनलाईटला देण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं.