मनसेचा धसका घेतला फवाद खानने, गुपचूप पाकिस्तानला पलायन
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात ४८ तासात परत जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. या इशाऱ्याचा धसका फवाद खानने घेतला. तो गुपचूप पाकिस्तानला निघून गेला.
मुंबई : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात ४८ तासात परत जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. या इशाऱ्याचा धसका फवाद खानने घेतला. तो गुपचूप पाकिस्तानला निघून गेला.
मनसेच्या इशाऱ्यानंतर अभिनेता फवाद खान याने गुपचूप भारत सोडल्याचे ‘नवभारत टाईम्स’ने वृत्त दिले आहे. दरम्यान, फवाद खान पुन्हा भारतात येणार नसल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
फवाद खान हा करन जोहरच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्कील’ या सिनेमात दिसणार आहे. तसेच तो कॉफी विथ करणच्या नव्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये येणार होता. मात्र, मनसेच्या इशाऱ्यानंतर या शोमधील पहिल्या भागात आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांना बोलावले आहे.