मुंबई : समस्त भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला मोगली पुन्हा एकदा भारतीयांच्या भेटीला आलाय. हॉलिवूड दिग्दर्शक जॉन फेवरू यांनी तयार केलेला 'द जंगल बूक' हा सिनेमा जगात सर्वात प्रथम भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपट निर्मात्यांना भारतात हा चित्रपट खूप कमाई करेल, अशी अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपचटाने तब्बल ९.७६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०१६ सालचा सर्वात जास्त 'ओपनिंग' करणारा हा हॉलिवूडचा आत्तापर्यंतचा पहिला चित्रपट ठरलाय. या चित्रपटाच्या कमाईशी तुलना करता येईल असा बॉलिवूडमधील एकमेव चित्रपट म्हणजे 'एअरलिफ्ट'... अक्षयकुमार स्टारर एअरलिफ्टची पहिल्याच दिवशीच कमाई १२.३५ करोड रुपये होती.  


महत्त्वाची बाब म्हणजे, हा चित्रपट केवळ डिजीटल सिनेमागृहात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला ओम पुरी, नाना पाटेकर, इरफान खान, प्रियांका चोप्रा यांनी आपला आवाज दिलाय.