COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईः 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज झाला आहे. टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा  'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' बायोपिक आहे.


उत्कंठा वाढवणारा संवाद


'जो धोनीला प्रमोट करत होता, धोनी आता त्यालाच बाहेर काढायला बघतोय. हा या तिघांना बाहेर काढून थांबणार नाही', असा संवाद या प्रोमोत असल्याने सर्वांची या सिनेमाबद्दल उत्कंठा वाढली आहे.


या सिनेमात धोनीची भूमिका बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारली आहे. हा सिनेमा ३० सप्टेंबर रोजी हिंदीसह, मराठी, तामीळ, तेलुगु भाषेत देशभरात प्रदर्शित होणार आहे. निरज पांडेने ‘धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.