मुंबई : अखेर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद मिटलाय. काही अटींसहीत दोघांनी सहसमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय अखेर घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी रात्री संजय आणि करिश्मा यांच्यात वकिलांसोबत दीर्घकाळ चर्चा झाली. दोघांच्या सहमतीनुसार, दोन्ही मुलं - समायरा आणि कियान - आई करिश्मासोबत राहतील. दरम्यान, संजयलाही मुलांना भेटण्याची परवानगी असेल, अशी माहिती करिश्माच्या वकिलांनी दिलीय.  


याशिवाय, संजय कपूर याच्या वडिलांचं मुंबईतील घर करिश्मा कपूर हिच्या नावावर करण्यात आलंय. संजय कपूरनं मुलांच्या खर्चासाठी १४ करोड रुपयांचे बॉन्डसही खरेदी केलेत. याचं महिन्याचं १० लाखांचं व्याज मुलांसाठी असेल.   


करिश्मा आणि संजयचा विवाह १४ वर्षांपूर्वी (२००३ साली) झाला होता. परंतु, २०१२ सालीच करिश्मानं संजयचं घर सोडलं होतं. सध्या, ती आपली आई बबितासोबत मुंबईत राहते. तर संजय दिल्लीत राहतो.


दोघांनी मुंबईत घटस्फोटासाठी २०१४ मध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, रवी पुजारी टोळीकडून धमक्या मिळत असल्यानं हा खटल्याची सुनावणी दिल्लीत व्हावी अशी मागणी केली होती.