ऑस्करच्या रेड कार्पेटवर मुंबईकर सनीची जादू
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासह आणखी एका नावाची जोरदार चर्चा होती तो म्हणजे चिमुकला मुंबईकर सनी पवार.
लॉस अँजेलिस : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासह आणखी एका नावाची जोरदार चर्चा होती तो म्हणजे चिमुकला मुंबईकर सनी पवार.
या छोट्या अभिनेत्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावत समस्य देशवासियांची मान अभिमानाने उंचावली. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात सनीची भूमिका असलेला 'लायन' या सिनेमाला तब्बल 6 नॉमिनेशन मिळाले होते.
पुरस्कार सोहळ्यात आल्यावर कसे वाटले असे त्याला विचारले असता सनी म्हणाला, ही भावना खरंच खूप भारी आहे आणि या सोहळ्यात मला सहभागी होता आल्याचा गर्व आहे.