मुंबई : 'सैराट' चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने अभिनेत्री (आर्ची) रिंकू राजगुरू आणि (परशा) आकाश ठोसर यांना प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न तसा सर्वांच्या मनातला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागराजने रिंकू आणि आकाशला हा प्रश्न विचारून तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार असल्याचं दाखवून दिलं आहे. एका न्यूज चॅनेलवरील कार्यक्रमात नागराजने रिंकू आणि आकाशला हा प्रश्न विचारला.


नागराजने रिंकू आणि आकाशला विचारलेला प्रश्न असा होता, तुम्हाला यापुढे चित्रपटात भूमिका नाही मिळाली तर तुम्ही काय करणार?


रिंकूने यावर उत्तर दिलं, मला यापुढे भूमिका नाही मिळाल्या तरी चालेल, मला डॉक्टर व्हायचंय, त्याकडे मी लक्ष देईन.


आकाश ठोसरने यावर म्हटलंय, मला चित्रपटात भूमिका नाही मिळालं तरी चालेल, मी कोणतंही काम करण्यास तयार असेल.


लंगड्या प्रदीपची भूमिका करणारा, तानाजी आपण आधुनिक शेती करणार असल्याचं सांगतो. तर सल्याची भूमिका करणारा अरबाज म्हणतो, मे जे पण काही करेन ते आनंदात करणार आहे, जीवन आनंदात घालवणार आहे.