पुणे : राज्यातील बलात्काराच्या घटनांसाठी सैराट चित्रपटाला काहीजण जबाबदार ठरवत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराट सिनेमा येईपर्यंत जग सुंदर होतं, सगळं चांगलं सुरु होतं. मात्र सैराट आला आणि अचानक बलात्काराच्या घटना घडू लागल्या. हे सत्य असेल तर सैराटला सुळी द्या अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी दिलीये. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 


याआधी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी सैराटसारख्या चित्रपटांवर बंदी घालावी अशी मागणी केली. त्यानंतर नागराज यांनी ज्यांना जे वाटतं त्यांनी ते करावं. ज्यांना सैराट बघायचाय त्यांनी बघावा आणि ज्यांना बंदी घालायचीये त्यांनी घालावी असे म्हटले होते.