`सैराट`मधील `लहान तात्या` कोण आहे?
सैराटमधील परशा आणि आर्ची मुलगा म्हणजे तात्या, या चिमुकल्या तात्याची निवड दिग्दर्शक नागराज मंजुळेने एक वेगळ्या पद्धतीने केली. तात्याची भूमिका साकारणाऱ्या मुलाचं नाव शिवम आहे.
मुंबई : सैराटमधील परशा आणि आर्ची मुलगा म्हणजे तात्या, या चिमुकल्या तात्याची निवड दिग्दर्शक नागराज मंजुळेने एक वेगळ्या पद्धतीने केली. तात्याची भूमिका साकारणाऱ्या मुलाचं नाव शिवम आहे.
शिवम हा पुणे पोलीस दलात काम करणाऱ्या राजेश मोरे यांचा मुलगा आहे. शेवटच्या सिनमध्ये जी शेजारीण तात्याला म्हणजे शिवमला घेऊन जाते. तिच शिवम मोरेची खरी आई आहे.
शिवम मोरेचा शेवटचा सीन हा प्रत्येकाचच काळीज चर्रर्र करणारा आहे. शिवमच्या रडण्याचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. पण त्या शांतते मागचा आक्रोश आणि त्याची वेदना प्रत्येकालाच स्पर्शून जाते यात काही शंकाच नाही.