नवी दिल्ली : ३ तारखेलाच राष्ट्रीय पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण झालं. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. सैराट सिनेमातील रिंकू राजगुरु, पार्श्वगायक महेश काळे, नंदिता धुरी, शशांक शेंडे यांच्यासह इतर मराठी कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. मराठी चित्रपटात नवनवीन प्रवाह आणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा ठसा उमटवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांना बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला पण जर अमिताभ बच्चन नसते तर बेस्ट अॅक्टर या पुरस्कार एका मराठी अभिनेत्याला मिळाला असता. राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलतांना रमेश सिपी यांनी याबाबत सांगितलं की, 'अमिताभ बच्चन जरी बेस्ट अॅक्टरसाठी निवडले गेले असले तरी बेस्ट अॅक्टरच्या स्पर्धेत असणारे नाना पाटेकर यांचा अभिनय देखील अप्रतिम होता.' त्यामुळे या दोन्ही कलाकारांमध्ये चांगलीच स्पर्धा होती. पण ज्युरींच्या अंकामध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव पुढे आलं. जर या स्पर्धेत अमिताभ नसते या पुरस्कार नाना पाटेकरांना मिळाला असता.



नटसम्राट या सिनेमातून अभिनयाच्या एका वेगळ्याच उंचीचं दर्शन घडवणाऱ्या नाना पाटकरांनी अमिताभ यांना या स्पर्धेत टक्कर दिली असं म्हणू शकतो.