मुंबई : बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांच्या मोबाईल नंबरची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांचा मोबाईल नंबर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्या नंबरवर फोन करुन चांगलेच हैराण केले. नानांचा मोबाईल नंबर समजून अनेकांनी त्यानंबरवर कॉल केला मात्र हा नंबर होता त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांचा.


चाहत्यांच्या कॉलनी सध्या मल्हार पाटेकर यांना चांगलेच हैराण झालेत. त्यांनी फेसबुक पोस्टवरुन व्हायरल झालेला नंबर नाना पाटेकर यांचा नसून आपला असल्याची माहिती दिली.