मुंबई : ड्रग्सची शेती करणे वा सेवन करणे हे भारतात अनधिकृत आहे. सिनेमात मात्र सगळं काही माफ असतं... म्हणूनच की काय आपल्या पुढच्या चित्रपटाकरिता अभिनेता नसरूद्दिन शहा गांजाची शेती करताना दिसणार आहेत...

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द ब्लू बेरी हंट' हा चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमातील पात्रे मराठी, हिंदी, मल्याळी, तामिळ आणि इंग्रजी अशी बहुभाषिक असणार आहेत.

चित्रपटाचे निर्माते, लेखक, निर्देशक अनूप कुरियन यांच्या चित्रपटाची स्टोरी गांजा याच विषयावर आधारित आहे. नसरूद्दिन शहा हे एका रिटायर्ड कर्नलच्या भूमिकेत दिसतील. अरबपती होण्याच्या प्रयत्नात हा कर्नल गांजाची शेती करतो मात्र जेव्हा विकायला जातो तेव्हाच काही वेगळ्याच समस्या समोर येतात.  

आश्चर्याची गोष्ट अशी की, या फिल्ममध्ये नसरूद्दिन शहांनी फ्रीमध्ये काम केलंय. पैशांच्या अभावी निर्माते कुरियन स्क्रिप्टमध्ये काट-छाट करून त्याची शॉर्ट फिल्म करणार होते. मात्र जेव्हा कुरियन नसरूद्दिन शहांकडे स्क्रिप्ट घेऊन आले तेव्हा त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी या सिनेमात फ्रीमध्ये काम करायचे ठरवलंय.