मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भाऊ कदम, निलेश साबळे, सागर कारंडे, कुशल बद्रिके यांनी अशी काही भूमिका वठवली की, सर्वांची हसून हसून वाट लागली. नटसम्राटची भूमिका साकारणारे नाना पाटेकर यांनी जरा हा कार्यक्रम पाहिला, तर ते या सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप नाही देणार, तर प्रेमाने मारच देतील.