नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाने  दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार पीडितांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अभिनेता सलमान खानने माफी मागितली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सुल्तानच्या छायाचित्रीकरणादरम्यान १२० किलो वजनाच्या मुलाला विविध अँगलने उचलून फेकून देण्याचे दृश्‍य चित्रीत केल्यानंतर माझी अवस्था बलात्कार झालेल्या महिलेसारखी होत होती', असे वक्तव्य सलमान खानने केले होते.


सलमानच्या या वक्तव्यावरून देशभरातून त्याच्यावर टीका करण्यात येत होती. राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला याबाबत खुलासा मागितला होता. मात्र त्याने त्याच्या वकिलामार्फत पाठविलेल्या उत्तरात माफी मागितली नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिथा कुमारमंगलम यांनी आज  पत्रकारांना दिली.