मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर हे आता स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींमध्ये झळकणार आहेत. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या जाहिरातींचे व्हिडीओ आज लॉन्च केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अभिनेत्री विद्या बालन यापूर्वी स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अँबेसिडर होती. अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर असतील. 


टीव्हीसोबतच ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून हे व्हिडीओ लोकांसमोर येणार आहेत. स्वच्छ भारत अभियानाचे व्हिडीओ हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमधून दिसतील.