मुंबई : शाद अली दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'ओके जानू' या सिनेमाचे शूटिंग चक्क् ३५ दिवसांत पूर्ण झालं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३५ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून शाद अलीने एक नविन रेकॉर्डच बनवलाय.
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओके जानू ही एक अशी स्टोरी आहे जी लीव इन रिलेशनशीप वर आधारित आहे.  ओके जानू हा २०१५ मधील मणी रतनम यांच्या 'ओके कन्मानी' या सुपरहिट तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

एक विलन, ABCD 2, बाघी यांसारख्या एकामागोमाग येण्याऱ्या सुपरहिट सिनेमांमुळे श्रद्धा कपूर सध्या बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर चांगलीच झळकतेय. मात्र आदीत्य कपूरला अजून त्याचा ठसा उमटवायला जमले नाहीये. आशिकी-२ मधल्या त्यांची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती त्यामुळे ओके जानू या सिनेमामुळे आदित्यला नक्कीच एक कीकस्टार्ट मिळेल.