मुंबई : बॉलीवूडमध्ये ब्रेकअपचा सिलसिला काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. फरहान- अधुना, रणबीर-कॅटरिना वेगळे होत असतानाच बॉलीवूडचे आणखी एक जोडपं विभक्त होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी आणि त्यांची पत्नी नंदिता यांनी २६ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. डीएनएच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात कोर्टाने या दोघांना वेगळे होण्याचे आदेश दिले. दरम्यान, ओमपुरींना त्यांच्या १८ वर्षाच्या मुलाला ईशानला भेटण्याची परवानगी देण्यात आलीये.  


२०१३ मध्ये नंदिताने ओमपुरीविरोधात मारहाणीचा आरोप केला होता. तसेच वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली होती. मात्र त्यावेळी ओम पुरी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच ओम पुरी यांचे त्यांच्या घरात काम करणारी महिला, तसेच केअरटेकर महिलेशी संबंध असल्याचा आरोप चरित्रात केला होता. मात्र ओम पुरींनी या पुस्तकावरही आक्षेप घेतला होता.