कराची : बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पाकिस्तान सरकारने परवनागी दिली मात्र नीरजा या सिनेमाला दिली नाही, बजरंगी भाईजान ही एक काल्पनिक कथा होती, तर नीरजा ही सत्य घटनेवर आधारीत आहे, पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टवरच नीरजाने आपले शौर्य दाखवत प्राण गमावले होते, एकूणच पाकिस्तानला काल्पनिक बजरंगी भाईजान चालला, पण सत्य घटनेवर आधारीत नीरजा हा सिनेमा चालला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरजा चित्रपटात पाकिस्तानचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचं कारण सांगून, पाकिस्तानात या सिनेमावर बंदी घालण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. सोनम कपूरची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. 


पाकिस्तानच्या चित्रपट मंडळापुढे हा चित्रपट सादर करण्यापूर्वीच चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅन-अ‍ॅम विमानातील कॅबिन क्रू असलेल्या कर्मचारी नीरजा भानोत यांनी प्रवाशांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारले, या प्रसंगावर आधारीत हे कथानक आहे.


पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित झाला असल्याचा काही जाहिरातींध्ये उल्लेख आहे. पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने चित्रपट आयात करण्यास परवानगी दिली होती, परंतु, त्यांनीही आता यू-टर्न घेतला आहे.


पाकिस्तानात १९८६ मध्ये कराची विमानतळावर ‘पॅन-अ‍ॅम‘ या विमानाच्या अपहरण प्रकरणातील सत्य घटनेवर हा चित्रपट आहे.