मुंबई : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान कलाकरांबाबत भारतात विरोध वाढू लागला. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देऊ नये अशी मागणी जोर धरु लागली. मनसेने देखील हीच मागणी जोरदार लावून धरली आणि पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परत जाण्याचा इशारा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी कलाकार फवाद खान पुन्हा एकदा एका नव्या बॉलिवूड सिनेमामध्ये दिसण्याची शक्यता आहे. सिनेनिर्माते श्याम बेनेगल पाकिस्तानी कलाकार फवाद खान याच्यासोबत नवा सिनेमा बनवणार असल्याची चर्चा आहे. भारत-पाकिस्तान कला संस्कृतीवर हा सिनेमा आधारीत असणार आहे. 'ये रास्ते है प्यार के' असं या सिनेमाचं नाव असल्याचं देखील चर्चा आहे. हर्ष नारायण हा सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत तर फवाद खान या सिनेमात म्यूजिशियनच्या भूमिकेत दिसणार आहे.


बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि श्याम बेनेगल यांच्या पाकिस्तानी कलाकारांवरील प्रतिक्रियेनंतर वाद सुरु झाला होता. श्याम बेनेगल यांनी म्हटलं होती की, माझा या मुद्द्यावर कोणतही मत नाही आहे. हे कलाकार भारतात यासाठी येतात कारण त्यांना काम करण्यासाठी बोलवलं जातं. त्यामुळे हे महत्त्वाचं नाही की, त्यांनी आपल्या सरकारचं प्रतिनिधीत्व करावं. जर ते त्यांच्या सरकारचं प्रतिनिधित्व करत असतील तर त्यांनी परतलं पाहिजे. ते येथे कलाकाराच्या रुपात आले आहेत. त्यामुळे त्यांना परत जाण्यासाठी सांगण्याचं मला काहीही कारण वाटतं नाही.