मुंबई :  ‘पार्च्ड’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना यादव यांनी गुजरातमधील ‘राबरी’ समाजातील व्यक्तींकडून अशा धमक्या येत असल्याचा दावा केला आहे.  बहुचर्चित ‘पार्च्ड’ चित्रपटात राधिका आपटेच्या भूमिकेची खमंग चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीना यादव यांनी तीन दिवसांपूर्वी ओशिवरा पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. लीना यांचे पती आणि पार्च्ड चित्रपटाचे सहनिर्माते असीम बजाज यांच्या फोनवर काही जण संपर्क साधत आहेत. हा क्रमांक लीना यांचा असल्याचं समजून धमक्या दिल्या जात आहेत. 


पार्च्ड या चित्रपटात करण्यात आलेल्या महिलांच्या चित्रणाबद्दल ते समाधानी नसल्याचं धमकावणाऱ्या व्यक्तींनी म्हटलं आहे. यावर यादव यांनी चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि गावं काल्पनिक असल्याचा खुलासा केला आहे. मात्र मुख्य भूमिका साकारणाऱ्या तनिष्ठा  चॅटर्जीची वेशभूषा आपल्या गावातील महिलांसारखी असल्याचा वाद समोरुन केला जातो.