सैराट सिनेमात परश्याची नोटीसबोर्डवर असलेली कविता
सैराट सिनेमामध्ये परशाने आर्चीसाठी लिहिलेली ही कविता तुम्हाला सिनेमा बघतांना कदाचित पूर्ण वाचता आली नसेल. सैराट सिनेमामधील त्यांच्या कॉलेजच्या noticeboard वर लावलेली ही कविता.
मुंबई : सैराट सिनेमामध्ये परशाने आर्चीसाठी लिहिलेली ही कविता तुम्हाला सिनेमा बघतांना कदाचित पूर्ण वाचता आली नसेल. सैराट सिनेमामधील त्यांच्या कॉलेजच्या noticeboard वर लावलेली ही कविता.
पाहा काय होती ती कविता
मुके पैंजण
एकटेपणाचे हे जीवघेने तट...
तू आता भराभर ढासळून टाक
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी
फाटलेल्या आभाळाला
टाके घालून सांधण्यासाठी
कारण मी आता माझ्याकडचा रस्ता
झाडून पुसून साफ केलाय
तुझ्या पायातल्या
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी
- प्रशांत काळे (एफ.वाय.बी.ए)