मुंबई : सैराटला मिळत असलेल्या प्रचंड यशामुळे सैराटची संपूर्ण टीम सध्या प्रसिद्धीझोतात आलीये. या चित्रपटातील आर्ची-परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात परश्याचे पात्र आकाश ठोसर या युवकानं रंगवला. आकाश मूळचा पुण्याचा. त्याला पहिल्यापासून कुस्तीची आवड होती. यामुळेच तो सोलापूरात आला आणि त्याची नागराज यांच्याशी भेट झाली. यातूनच त्याला हिरोचा रोल मिळाला. अभिनयाची आकाशला थोडीही कल्पना नव्हती. मात्र सैराटने त्याला हिरो बनवलाय.


आकाशला आयुष्यात पुढे काय बनायचे होते असा प्रश्न त्याला एका चॅनेलवरील मुलाखतीत विचारण्यात आला तेव्हा पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकूलाही हा प्रश्न विचारण्यात आला असता तिने आपल्याला डॉक्टर बनायचे असल्याचे सांगितले.