मुंबई : अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या ब्रेकअपची बातमी त्यांच्या चाहत्यांना फारशी रुचलेली नव्हती... पण, आता मात्र या त्यांना सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यातील वाद-विवाद आणि मतभेद बाजुला सारून अंकिता आणि सुशांत पुन्हा एकत्र येणार असल्याचं सांगितलं जातंय. 


याआधी, सुशांतचं त्याच्या 'राबता'फेम सहअभिनेत्री क्रिती सेनन हिच्याशी संबंध असल्याचं सांगण्यात येत होतं. फिल्म शुटिंगदरम्यान त्यांची जवळिक वाढली होती. यामुळेच सुशांत आणि अंकिताचं बिनसल्याचंही म्हटलं जात होतं. 


पण, आता मात्र सुशांतनं आपल्या कामाच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून आपल्या नात्याला द्यायचा निर्णय घेतलाय. अंकिताची समजूत काढण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतोय. त्यामुळे ही दोघं पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हं आहेत.