मुंबई : शिक्षण विभागात राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघु चित्रपट 'पायवाट'ची स्क्रिनिंग आज मुंबईत होणार आहे. पायवाटचं दिग्दर्शन मिथुनचंद्र चौधरी यांने केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलींच्या शिक्षणावर आधारीत हा सिनेमा आहे. मिथुनने आपल्या बहिणीचे शिक्षणासाठीचे कष्ट पाहून हा सिनेमा तयार केला आहे.


'पायवाट' सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी मिथुनचंद्रच्या 'हेलमेट' आणि 'घनदाट' या दोन लघुचित्रपटांनी काही पुरस्कार पटकावले आहेत. सैराटनंतर आता 'पायवाट'ची चर्चा होत आहे.


मुंबईत माटुंगा पूर्वला वेलिंगकर इन्स्टीट्यूटमध्ये सायंकाळी सहा वाजता (१८ मे २०१५) 'पायवाट' दाखवला जाणार आहे. यावेळी दिग्दर्शक मिथुनचंद्र चौधरी उपस्थित राहणार आहे.