PHOTO : `रॉयल कपल`चं `रॉयल` फोटोशूट
अभिनेता सैल अली खान-पतौडी आणि त्याची गर्भवती पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान यांनी नुकतंच एक फोटो शूट केलंय... यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
मुंबई : अभिनेता सैल अली खान-पतौडी आणि त्याची गर्भवती पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान यांनी नुकतंच एक फोटो शूट केलंय... यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
बॉलिवूड आणि राजघराणं असं काहीसं कॉम्बिनेशन या दोघांच्या फोटोंवरून दिसतंय... 'सैफिना'ची जोडी 'रॉयल कपल' म्हणून ओळखली जाते.
सैफ आणि बेगम करिना यांनी 'हार्पर्स बाझार ब्राईड' या मासिकाच्या नोव्हेंबर एडिशनसाठी हे फोटोशूट केलंय.
आपल्या 'रॉयल इश्यू'साठी या मॅगझिननं सैफ आणि करीनाची निवड केली... आणि गर्भवती असताना करीनानं या फोटोशूटमधून आणि एका रिचनेसमधून अनेकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं.
फोटोग्राफर आर. बर्मन यांनी सैफ आणि करीनाचे हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेत.